विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल!!
माझी वारी ला जाण्याची ही पहिलीच वेळ. माझ्या आजोबा व काकांना ज्या वर्षी वेळ मिळत असे तेव्हा ते वारीला जायचे त्यामुळे मला लहानपणापासूनच वारी बद्दल थोडीफार माहिती होती. यावेळी सहज एका पुण्यात राहणाऱ्या मित्राने विचारले की जायचे का या वर्षी पुणे ते सासवड वारीला? मी त्याला तारीख विचारली आणी थोडी चौकशी केली. माझी वारीला जाण्याची इच्छा होतीच,अनायसे संधी चालून आली होती त्यामुळे जास्त विचार न करता पुण्याला जायचे ठरले.
महाराष्ट्रात दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो विठ्ठलभक्त पंढरपूरला जातात. या यात्रेला वारी म्हटले जाते कारण वारी करणारे वारकरी नेमाने पंढरपूरला जातात. पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात (13 th century) ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात.या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो.
आम्ही सकाळी ७.१५ स्वारगेट वरून सुरुवात केली तेव्हा पालखी आमच्या पुढे होती. हडपसर सोडले तेव्हा पालखी दिसायला लागली,चौकशी केल्यानंतर आम्हाला कळाले की ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे आणी तुकाराम महाराजांची पालखी खूप मागे आहे.
आम्हाला सासवड पर्यंत वारी करायची होती म्हणून आम्ही ठरवले की अाता ज्ञानेश्वरांच्या पालखी सोबतच चालत रहायचे आणि वाटेत दर्शन घेऊन पुढे जायचे.
साधारण१५ कि.मी चालल्यावर असे वाटले की बास यापुढे चालणे शक्य नाही, पायाचे तळवे दुखायला लागले होते. एरवी डोंगरातुन फिरताना ३० कि.मी असो किंवा ५० कि.मी काहीच वाटत नाही पण डांबरी रस्त्यावर ५ कि.मी चाल्यावर सुद्धा पाय दुखायला लागतात. तसेच काहीसे आमच्या सोबत घडत होते, पण आम्ही निश्चय केला होता सासवड पर्यंत काहीही झाले तरी वारी पूर्ण करायची.
आजुबाजुला लाखोंच्या संख्येने वारकरी हरीनाम घेत, भजन करत, विठ्ठल नामाचा गजर करत चालत होते, त्याचीच जादू म्हणायची की काय कुणास ठाऊक पण आम्ही चालत राहिलो.असे म्हणतात की तुम्ही फक्त देवाचे नाव घेत चला बाकी सगळी काळजी तोच करतो. वाटेत वारी करण्यासाठी आलेल्या लोकांसाठी खाण्यासाठी( पोहे, साबुदाणा खिचडी, बिस्कीट, राजगिरा लाडू, विविध फळे) पिण्यासाठी (मिनरल पाणी, चहा, सरबत , शासनातर्फे पिण्याच्या पाण्याचे टँकर) जागोजागी होते. वारकर्यांची काही सेवा आपल्य हातून व्हावी यासाठी स्थानिक लोक या सुविधा पुरवत असतात.
दिवे घाटाच्या अलीकडे एक पूल लागतो. या ठिकाणी गर्दी कमी असल्याने आम्ही तिथेच दर्शन घ्यायचे ठरविले व पुढे झालो.पालखीतील पादुकांचे दर्शन झाल्यावर खूप समाधान झाले आणि पुढच्या प्रवासासाठी बळही मिळाले. घाटाच्या सुरूवातीला पाऊसही सोबतीला आला .
पुणे ते सासवड हा वारीतील मोठा टप्पा आहे ..पण आजूबाजूच्या वारकर्यांची सोबत, हरीनामाचा गजर आणि पावसाची संगत यामुळे तो सुसह्य झाला. शेवटी शेवटी थोडा कंटाळाही आला पण मुक्कामाच्या ठिकाणी जायचेच होते. सकाळी साडेसात वाजता सुरू केलेला प्रवास संध्याकाळी साडेपाचला संपला तो एक वेगळाच अनुभव देऊन. आम्ही फक्त 32 कि.मी. चा एक टप्पा पूर्ण केला पण हे वारकरी दरवर्षी आळंदी ते पंढरपूर अशी वारी न चुकता करतात हे खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशी " वारी" एकदा तरी व्हावी अशी इच्छा आहे.

विठ्ठल विठ्ठल !!
ReplyDelete