Omkareshwar Temple, Pune
ओंकारेश्वर मंदिर, पुणे.
महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही महाराष्ट्राची शान आहे. यामध्ये अनेक धार्मिक, पुरातन, देवाची मंदिरांचा समावेश आहे. मला, ही देवस्थान फिरायला आवडतात कारण त्यांना एक इतिहास लाभला असतो व अनेक मंदिरावरील कलाकुसर बघण्यासारखी असतात.
महाराष्ट्रातील पेशवे कालीन मंदिरांपैकी एक म्हणजे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर. हे मंदिर पुण्यातील अनेक पेशवे कालीन मंदिरांपैकी सगळ्यात मोठे मंदिर म्हणून ओळखले जाते.
चिमाजी अप्पा पेशवे यांनी चित्राव शास्त्री आणि श्रीराम भट्ट शास्त्री यांच्या मार्फत २८० वर्षा पूर्वी या मंदिराची रचना केली. मुळ ओंकारेश्वर जे स्थान आहे, तिथून सोहळ्यामध्ये कावड करून, हे शिवलिंग आणले गेले होते. पेशव्यांनी ऑक्टोबर १७३६ मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली.
मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या या मंदिराला नक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरुंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणा-मार्ग अशी आगळीवेगळी वैशिष्ट्ये या मंदिराची आहे.
मंदिरात प्रवेश करताच नंदीच दर्शन होत. नंदीच्या बाजूला काळभैरव व सुर्य देवच्या मुर्ती दिसतात. तर गाभाऱ्याच्या बाजूला असलेल्या विठू - रखुमाईचे दर्शन होताच आपले हात आपोआप जोडले जातात. गाभाऱ्यातील ओंकारेश्वराच्या पिंडीवर होणाऱ्या जल अभिषेक पाहून आपणही ध्यानमस होतो.
पेशवे कालीन हे मंदिर लोकांच्या फारस्या नजरेत येत नाही. तीन भागात बांधलेल्या मंदिरात आपल्यास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. भाविक या ओंकारेश्वर मंदिरात येतात ते मुळात ईश्र्वर चरणी लीन होण्या करिता व मानसिक शांती मिळविण्या करिता. तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की भेट द्या.
पात्ता : श्री ओंकारेश्वर मंदिर.
बालगंधर्व पूल,
चंद्रशेखर गोविंद आपटे मार्ग,
शनिवार पेठ, पुणे - ४११०३०.
शब्दांकन : स्मृती कुडाळकर.
Comments
Post a Comment